
पिंपरी : इंदिरानगर वसाहत म्हणजे चिंचवड स्टेशन परिसरातील एक भाग. वसाहतीत जाण्यासाठी अवघे दोन मार्ग. एक चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्त्यावरील एमायडीसी कार्यालयाची संरक्षक भिंत आणि एका पंचतारांकित हॉटेल यांच्यातील अवघी आठ-दहा फुटांची निमुळती वाट. आणि दुसरा रस्ता म्हणजे मोहननगर ते मोरवाडी न्यायालय रस्त्यावरील एका शैक्षणिक संकुलालगतचा निमूळता मार्ग. हे दोन रस्ते सोडले तर सर्व बाजूंनी बंदिस्त भाग. तरीही येथे कोरोनाने शिरकाव केला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळलेले चौघे जण बरे होऊन घरी गेले. पण, आता महिन्यांनंतर कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. गेल्या चार दिवसांत दोघांना संसर्ग झाला आहे.
इंदिरानगरमध्ये पहिला रुग्ण आढळला. त्याच वेळी परिसर सील करण्यात आला होता. वसाहतीत जाण्यासाठीचे दोन्ही रस्ते लोखंडी पत्रे लावून बंद केले होते. नागरिकांनी घराबाहेर पडू नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात होता. चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर त्या चौघांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. सील केलेला भाग अर्थात कंटेन्मेंट झोन कमी करण्यात आला. दरम्यान, सरकारने निर्बंध शिथिल केले. लोक घराबाहेर पडू लागले. सर्व काही पहिल्या सारखं सुरळीत झाले पण, घात झाला आणि कोरोना पुन्हा सक्रिय झाला.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेल्या चार दिवसांपूर्वी एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली. त्यातील एकाचा अहवाल परवा पाॅझिटीव्ह आला आणि गेला गेला म्हणता म्हणता कोरोनाचा संसर्ग इंदिरानगरमध्ये पुन्हा आढळून आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. घरांमध्ये सुद्धा सोशल डिस्टंसिंग पाळायला हवे. किमान मास्क तरी वापरायला हवे. घराबाहेर जाणारांनी दोन मास्क सोबत ठेवावेत. पावसामुळे एक ओला झाला तर दुसरा वापरता येईल, अशी व्यवस्था करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.