esakal | बारा ते अठरा वर्षांच्या मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी I Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

बारा ते अठरा वर्षांच्या मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - अहमदाबाद येथील झायडस कॅडीला कंपनीने मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. त्याची चाचणी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये मार्चपासून १२ ते १८ वयोगटातील ४७ मुलांवर करण्यात आली. सर्व मुलांचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस पूर्ण झाले असून त्यांना कोणताही त्रास झाला नाही, असा दावा रुग्णालयाने केला आहे.

देशातील अठरा वर्षांखालील मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी केली जात आहे. त्यासाठी झायडस कॅडीला कंपनीने झायकोव्ह-डी नावाची लस निर्माण केली आहे. तिची चाचणी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. त्याबाबत हाॅस्पिटलच्या डॉ. शलाका आगरखेडकर यांनी सांगितले की, मुलांना लस देण्यापूर्वी आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या होत्या. ४७ मुलांना लस देण्यात आली. त्यासाठी त्यांच्या पालकांची संमती घेतली होती. सर्व मुलांना २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस दिले. कोणालाही त्रास झालेला नाही. मार्चपासून लस देणे सुरू केले होते‌‌. २६ ऑगस्टपर्यंत सर्वांचे तीन डोस पूर्ण झाले आहेत‌‌.

loading image
go to top