देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट...

मुकुंद परंडवाल
रविवार, 28 जून 2020

आषाढी एकादशीला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत जाणाऱ्या संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखी सोहळ्यातील सेवेकरी अशी वीस जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा. सुनिता जोशी यांनी दिली.

देहू (पुणे) : आषाढी एकादशीला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत जाणाऱ्या संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखी सोहळ्यातील सेवेकरी अशी वीस जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा. सुनिता जोशी यांनी दिली.

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

शासनाच्या आदेशानुसार आषाढी एकादशीला जाणाऱ्या वीस जणांना कोरोना टेस्ट करणे आवश्यक होते. संत तुकाराम महाराजांच्या पादुका येत्या मंगळवारी (ता. 30) एसटी बसमधून पंढरपूरला नेण्यात येणार आहे. या एसटी बसमधून संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखीचे सेवेकरी असे वीस जण पंढरपूरला जाणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासनाच्या आदेशानुसार या बसमधील सर्वांची कोरोना टेस्ट करण्याचे बंधन होते. शनिवारी(ता. 27) देहूरोड येथील रुग्णालयात या वीस जणांनी कोरोना टेस्ट केली. त्यात त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असे डॅा. जोशी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of Dehu Sansthan office bearers is negative