esakal | Corona - पिंपरी चिंचवडमध्ये 93 नवे रुग्ण; शहराबाहेर एकही मृत्यू नाही
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 89 हजार 693 जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 86 हजार 617 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona - पिंपरी चिंचवडमध्ये 93 नवे रुग्ण; शहराबाहेर एकही मृत्यू नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाचा वेग आता मंदावला आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी कोरोनाची आकडेवारी दिलासादायक अशी आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसभरात 93 नवे रुग्ण आढळले आहेत. शहरामध्ये कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेर मात्र एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 89 हजार 693 जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 86 हजार 617 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरातील 88 जण कोरोनामुक्त झाले. सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 512 इतकी आहे.

पिंपरी चिंचवडमधील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1564 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरांमध्ये 648 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या तीन मृत्यूमध्ये चिंचवड, काळेवाडी आणि पिंपळे गुरव इथल्या रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला रुग्ण होती. सध्या महापालिके रुग्णालयात 611 रूग्ण उपचार घेत असून 901 रुग्ण होम आयसोलेट आहेत.