पिंपरी चिंचवडमध्ये आठवड्याभराने मृतांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 95 नवे रूग्ण

corona Pimpri-Chinchwad city
corona Pimpri-Chinchwad city

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 95 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 89 हजार 788 झाली आहे. तर 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 678 पोहोचली आहे. सध्या एक हजार 541 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात शहरातील पाच आणि बाहेरील तीन अशा आठ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांतील आजचा मृतांचा आकडा सर्वाधिक ठरला.

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 569 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 651 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय 70), काळेवाडी (वय 72), रावेत (वय 69), भोसरी (वय 63), यमुनानगर (वय 63) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष नारायणगाव (वय 65), कोथरूड (वय 63), चाकण (वय 55) येथील रहिवासी आहेत.

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 621 रूग्ण उपचार घेत आहेत. 920 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 111 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 929 रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाची लक्षणे असलेले 932 संशयित आज तपासण्यात आले. त्यातील 739 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज तपासण्यात आलेल्या 193 जणांसह एक हजार सहा जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत चार लाख 31 हजार 344 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील तीन लाख 40 हजार 550 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्या 895 जणांना आज घरी सोडण्यात आले. आजपर्यंत अशा चार लाख 27 हजार 826 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कंटेन्मेंट झोन मधील दोन हजार 191 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात सात हजार 190 जणांची तपासणी करण्यात आली. आज 347 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 65 हजार 330 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

सध्या शहरातील 848 रुग्ण असिम्टोमेटिक आहेत. 134 रुग्ण सिम्टोमेटिक आहेत. 39 रुग्ण गंभीर असून केवळ 24 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहराबाहेरील 111 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 933 रुग्ण बरे झाले आहेत. 

मंगळवारपर्यंत शहरातील 55 हजार 413 पुरुष, 33 हजार 996 महिला आणि 13 तृतीय पंथियांना कोरोना संसर्ग झाला आहे. वयोगटानुसार 12 वर्षांखालील सहा हजार 554 मुले, 13 ते 21 वर्षे वयाचे सात हजार 363 युवक, 22 ते 39 वयोगटातील 36 हजार 293 तरुण, 40 ते 59 वयोगटातील 27 हजार 184 प्रौढ आणि 11 हजार 959 ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com