esakal | Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात 370 नवीन रुग्ण; 831 रुग्णांवर सध्या उपचार सुरु

बोलून बातमी शोधा

corona }

कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीस लागलेली दिसून येत आहे. 

Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात 370 नवीन रुग्ण; 831 रुग्णांवर सध्या उपचार सुरु
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी, ता. 27 : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 370 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 5 हजार 281 झाली आहे. आज 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 73 झाली आहे. सध्या तीन हजार 367 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 4 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 841 आणि शहराबाहेरील 772 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 22 हजार 826 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 831 रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार 536 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

कंटेन्मेंट झोनमधील 633 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 924 जणांची तपासणी केली. 880 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 35 हजार 313 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आज दोन हजार 321 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 1 हजार 641 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 1185 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 281 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

हेही वाचा - Corona : देशात 113 रुग्णांचा शनिवारी मृत्यू; रुग्णसंख्येत वाढ

आजपर्यंत सहा लाख 59 हजार 962 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 53 हजार 496 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 54 हजार 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 71, 75),  वाल्हेकरवाडी (वय 51)  व महिला पिंपरी (वय 90) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

प्रभाग कार्यालयनिहाय बाधित रूग्ण पुढील प्रमाणे,
अ- 43, ब- 60, क- 34, ड- 72, इ-62, फ- 51, ग-22, ह- 26.