
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 20) 102 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 333 झाली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 20) 102 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 333 झाली आहे. आज 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 91 हजार 856 झाली आहे. सध्या एक हजार 742 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक रुग्णाचा मृत्यू झाला. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 735 झाली. आजपर्यंत शहराबाहेरील 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिखली (वय 53) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या महापालिका रुग्णालयांत 754 रुग्ण उपचार घेत आहेत. 988 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 960 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 267 जणांची तपासणी करण्यात आली. आज 631 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 79 हजार 502 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.