Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 102 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

एकूण रुग्णसंख्या एक लाख एक हजार 111 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 102 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख एक हजार 111 झाली आहे. आज 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 515 झाली आहे. सध्या एक हजार 771 सक्रिय रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज शहरातील तीन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 825 आणि बाहेरील 768 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 673 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत 10 हजार 182 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 620 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 151 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

कंटेन्मेंट झोनमधील 325 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 133 जणांची तपासणी केली. 901 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 20 हजार 188 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज एक हजार 318 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 347 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 321 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 376 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आजपर्यंत सहा लाख 29 हजार 185 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 27 हजार 753 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सहा लाख 25 हजार 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष चिंचवड (वय 60), महिला चऱ्होली (वय 58), चिखली (वय 71) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील मृत्यू झालेले नागरिक पुरुष मंचर (वय 45) येथील रहिवासी आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in pimpri chinchwad 102 new cases found

Tags
टॉपिकस