esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 103 नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 103 नवे पॉझिटिव्ह
  • पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (ता. 21) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 103 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 436 झाली आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 103 नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (ता. 21) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 103 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 436 झाली आहे. आज 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 91 हजार 954 झाली आहे. सध्या एक हजार 745 सक्रिय रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज शहरातील दोन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 737 झाली. आजपर्यंत शहराबाहेरील 714 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिखली (वय 58) व महिला भोसरी (वय 73) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील महिला दौंड (वय 72) येथील रहिवासी आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 748 रुग्ण उपचार घेत आहेत. 997 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 914 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 53 जणांची तपासणी करण्यात आली. आज 643 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 80 हजार 145 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

आज एक हजार 421 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील दोन हजार 850 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज एक हजार 415 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 599 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत पाच लाख 29 हजार 845 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 33 हजार 810 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 25 हजार 919 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

loading image