पिंपरी-चिंचवडमध्ये आज 125 नवे रुग्ण; इंग्लंडहून आलेल्यांचा अहवाल प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

  • इंग्लंडहून आलेल्या 23 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 125 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 608 झाली आहे. आज 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 365 झाली आहे. सध्या एक हजार 487 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील दोन, अशा चार व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेल्या 23 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 756 झाली आहे. तर, शहराबाहेरील 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष आकुर्डी (वय 65) व महिला चिंचवड (वय 82) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष आंबेगाव (वय 45) व महिला निमगाव (वय 63) येथील रहिवासी आहेत. 

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून, 159 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. 23 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 632 रुग्ण उपचार घेत आहेत. 855 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 363 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 175 जणांची तपासणी करण्यात आली. आज 749 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 87 हजार 95 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

आज दोन हजार 51 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 804 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून एक हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 511 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत पाच लाख 49 हजार 761 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 51 हजार 642 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 46 हजार 568 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in pimpri chinchwad 125 new cases found