Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 134 जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

  • पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 133 रुग्ण आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 133 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख एक हजार 381 झाली आहे. आज 134 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 792 झाली आहे. सध्या एक हजार 763 सक्रिय रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 826 आणि बाहेरील 769 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 620 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत 11 हजार 320 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 664 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 99 रुग्ण होम आयसोलेट आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील 336 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 134 जणांची तपासणी केली. 818 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 21 हजार 837 जणांचे विलगीकरण करण्यात आले.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज एक हजार 176 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 908 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 668 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 176 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत सहा लाख 31 हजार 357 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 29 हजार 308 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सहा लाख 27 हजार 276 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष मंचर (वय 65) येथील रहिवासी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in pimpri chinchwad 133 new cases found