पिंपरी-चिंचवडमध्ये आज 135 नवे रुग्ण; तर 44 जणांना डिस्चार्ज 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 135 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 654 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 135 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 654 झाली आहे. आज 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 169 झाली आहे. सध्या एक हजार 691 सक्रिय रुग्ण आहेत. आज कोणाचाही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील एक हजार 794 आणि शहराबाहेरील 756 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या रुग्णालयांत 627 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 64 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 663 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 881 जणांची तपासणी केली. 760 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख सहा हजार 337 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज एक हजार 439 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 187 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. एक हजार 700 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत सहा लाख तीन हजार 985 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख दोन हजार 631 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in pimpri chinchwad 135 new cases found

Tags
टॉपिकस
Topic Tags: