Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 90 हजारांचा आकडा पार 

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 90 हजारांचा आकडा पार 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी, ता. 19) 179 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 125 झाली आहे. आज 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 856 झाली आहे. सध्या एक हजार 692 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार आणि बाहेरील एक, अशा पाच जणांचा मृत्यू झाला. 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 577 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 652 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष काळभोरनगर (वय 48), थेरगाव (वय 57), पिंपळे गुरव (वय 60) व महिला पिंपळे गुरव (वय 80) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेली शहराबाहेरील महिला आळंदी (वय 86) येथील रहिवासी आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 628 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 64 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 96 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 944 रुग्ण बरे झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 657 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात पाच हजार 847 जणांची तपासणी करण्यात आली. आज 346 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 66 हजार 31 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com