
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 195 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 939 झाली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 195 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 939 झाली आहे. आज 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 231 झाली आहे. सध्या दोन हजार 59 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सात व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 649 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 678 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष पिंपरी (वय 57, 82), थेरगाव (वय 65), पिंपळे गुरव (वय 65), पिंपळे सौदागर (वय 63) व महिला पिंपळे गुरव (वय 74), संत तुकाराम नगर (वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील महिला लोहगाव (वय 53), जुन्नर (वय 71) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या महापालिका रुग्णालयांत 811 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 248 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 322 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 462 जणांची तपासणी करण्यात आली. आज 422 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 71 हजार 688 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.