पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना कोरोना लस; आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली पहिली लस 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसांना कोरोनाची लस देण्यास मंगळवारपासून (ता. 9) सुरुवात झाली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसांना कोरोनाची लस देण्यास मंगळवारपासून (ता. 9) सुरुवात झाली. पहिली लस पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली. तर दुसरी लस अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवडमधील आयुक्तालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शहर पोलिस दलातील सर्व पोलिसांना लस दिली जाणार आहे. सर्व पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले आहे. सध्या पोलिस आयुक्तालयात तीन हजारांहून अधिक पोलिस कार्यरत आहेत. त्या सर्वांचे लसीकरण करून घेतले जाणार आहे. सर्वत्र कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सुरूवातीला वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आता पोलिसांना देखील लस दिली जात आहे. कर्तव्यावर असताना पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पाचशेहून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तीन पोलिसांचा मृत्यू झाला. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आता लसीकरण सुरू झाल्याने पोलिस दलासाठी ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान, शहर पोलिस दलातील पंधरा ठाणे, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा यासह विविध विभागात कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine to police in pimpri chinchwad