esakal | पिंपरी चिंचवड पोलिस दलात कोरोनाचा तिसरा बळी  
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh-Lohokare

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील रमेश लोहोकरे (वय 37)  यांचा शुक्रवारी (ता. 23) कोरोनामुळे मृत्यू झाला. ते चिंचवड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. पिंपरी चिंचवड पोलिस दलातील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस दलात कोरोनाचा तिसरा बळी  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील रमेश लोहोकरे (वय 37)  यांचा शुक्रवारी (ता. 23) कोरोनामुळे मृत्यू झाला. ते चिंचवड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. पिंपरी चिंचवड पोलिस दलातील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोहोकरे यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोनाची तपासणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. लोहोकरे हे पत्नी व मुलीसह चिंचगवड येथे राहत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्याप्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलात आतापर्यंत तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Edited By - Prashant Patil