esakal | Breaking : पिंपरीतून कोरोना काढतोय पळ; 27 झोनमध्ये 14 दिवसांत एकही रुग्ण नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking : पिंपरीतून कोरोना काढतोय पळ; 27 झोनमध्ये 14 दिवसांत एकही रुग्ण नाही!

शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपाययोजनांसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण आढळलेले 69 भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सील केले आहेत.

Breaking : पिंपरीतून कोरोना काढतोय पळ; 27 झोनमध्ये 14 दिवसांत एकही रुग्ण नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी  : शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपाययोजनांसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण आढळलेले 69 भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सील केले आहेत. तर, गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण न आढळल्याने 27 झोन यातून वगळण्यात आले आहेत. शहरासाठी ही बाब दिलासादायक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी (ता. 19) दुपारी बारापर्यंत संसर्ग झालेल्या नागरिकांची एकूण संख्या 233 झाली. त्यातील 132 जण बरे झालेले आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मंगळवारी मृत्यू झालेल्या महिलेसह दोघांचा समावेश आहे. सध्या 95 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत उच्चभ्रू व मध्यमवर्गीय सोसायटीत आढळणारा संसर्ग गेल्या चार-पाच दिवसांपासून झोपडपट्टीत शिरला आहे. आनंदनगरमध्ये एकाच दिवशी सोमवारी (ता. 18) तब्बल 18 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नवीन भागात रुग्ण सापडत असल्याचे दिसून येत असून, ते ‘कंटेनमेंट झोन' जाहीर केले जात आहेत. सध्या 42 ‘कंटेनमेंट झोन' आहेत. यापूर्वी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिलदरम्यान संपूर्ण शहर ‘कंटेनमेंट झोन' घोषित केले होते. परंतु, रुग्णवाढीचा दर कमी झाला असल्याचे सांगून त्यांनी प्रतिबंधित क्षेत्र शिथिल केले व रुग्ण आढळलेले भागात सील केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिन्यापेक्षा अधिक कंटेनमेंट झोन

खराळवाडीत 16 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून म्हणजे दोन महिन्यांपासून हा भाग कंटेनमेंट झोन आहे. तसेच, शिवनेरी कॉलनी पिंपळे गुरव, रुपीनगर, गंधर्वनगरी मोशी व विजयनगर दिघी येथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण आढळले होते. हे भागही एक महिन्यापेक्षा अधिक काळ कंटेनमेंट झोन आहेत. 

सध्याचे अन्य कंटेनमेंट झोन

पिंपळे सौदागर शुभश्री सोसायटी, साई पॅरेडाईज; फुगेवाडी; आकुर्डी शुभश्री परिसर; पिंपळे गुरव जगताप कॉम्पलॅक्सत, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, कवडेनगर; भोसरी गुरुविहार सोसायटी, लांडगेनगर, हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, चक्रपाणी वसाहत; जुनी सांगवी मधुबन सोसायटी, पवनानगर; काळेवाडी; रहाटणी छत्रपती चौक, तांबे शाळा, तापकीर चौक, ज्ञानगंगा गृहनिर्माण सोसायटी; वाकड कस्पटे वस्ती; थेरगाव दत्तनगर; चिंचवड स्टेशन इंदरानगर, मोहननगर, आनंदनगर; किवळे विकासनगर; मोशी बनकर वस्ती, वुड्‌स विले; दिघी विजयनगर, अमृतधारा; चऱ्होली निकमवस्ती, साठेनगर; रुपीनगर पंचदुर्गा परिसर; तळवडे न्यू अँजल स्कूल; चिखली ताम्हाणे वस्ती, मोरेवस्ती; संभाजीनगर आंब्रेला गार्डन, बजाज स्कूल; पिंपरी भाटनगर. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वगळलेला भाग

पिंपळे सौदागर गावठाण; कासारवाडी रामराज प्लॅनेट; ताथवडे गावठाण चौक; वाकड कावेरीनगर, जीवननगर; पिंपरी तपोवन रस्ता; नेहरुनगर; दापोडी गणेशनगर; पिंपळे सौदागर गावठाण; पिंपळे निलख शिवाजी चौक; पुनावळे कुंभार गल्ली, ओव्हाळवस्ती; थेरगाव 16 नंबर बसथांबा, शिवतेजनगर, क्रांतिवीरनगर, पडवळनगर, गणराज कॉलनी; भोसरी खंडोबा माळ, पीएमटी चौक, आदिनाथनगर, शास्त्री चौक, गुरुदत्त कॉलनी; मोशी नागेश्वपरनगर; चऱ्होली तनिष्क; दिघी बीयू भंडारी, रोडे हॉस्पिटल, तनिष्क आयकॉन; संभाजीनगर; चिखली घरकूल. 

  • एकूण कंटेनमेंट झोन : 69 
  • सध्याचे कंटेनमेंट झोन : 42 
  • वगळलेले झोन : 27
loading image