पर्यटन नगरी लोणावळ्यात कोरोना कसा शिरला एकदा वाचाच...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

पर्यटन नगरी असा लौकीक असलेल्या लोणावळ्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. खंडाळ्यातील ७४ वर्षीय वृद्धाचा कोरोना तपासणी अहवाल बुधवारी (ता.२७) पाॅझिटीव्ह आला असल्याची माहीती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

लोणावळा : पर्यटन नगरी असा लौकीक असलेल्या लोणावळ्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. खंडाळ्यातील ७४ वर्षीय वृद्धाचा कोरोना तपासणी अहवाल बुधवारी (ता.२७) पाॅझिटीव्ह आला असल्याची माहीती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुणे जिल्ह्यातही आकडा वाढत आहे. मावळातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या दहावर गेली आहे. गेली दोन महीने प्रशासनाच्या वतीने प्रचंड मेहनत घेण्यात येत पर्यटन नगरीतील कोरोनाचा शिरकावर रोखण्यात यश आले होते.

खंडाळ्यातील एका वृद्धास न्यूमोनियाच्या आजारामुळे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयास तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीसाठी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, बुधवारी सदर ७४ वर्षीय वृद्धाचा कोविड १९ चा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला. पर्य़टननगरीत खळबळ उडाली असून लोणावळ्यासह खंडाळ्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सदर रुग्णाच्या परिवारासह हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील नऊ जणांना तळेगाव दाभाडे येथील सुगी पश्चात केंद्रातील कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून येथील नेताजी वाडी, खंडाळा बाजारपेठेतील काही भाग सील करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus infection in Lonavla