esakal | सुशिक्षित व सुसंस्कृत राज्यकर्त्यांची देशाला गरज : विक्रम गोखले
sakal

बोलून बातमी शोधा

vikram gokhale

सुशिक्षित व सुसंस्कृत राज्यकर्त्यांची देशाला गरज : विक्रम गोखले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गलीच्छ राजकारणामुळे देश हिताला बाधा येते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण देश हिताचा विचार केला पाहिजे. त्यामुळे सुशिक्षित व सुसंस्कृत राज्यकर्त्यांची भारत देशाला गरज आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मांतग साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत गोखले बोलत होते. 'राजकारण पुर्वीचे व आजचे' या विषयावर बोलताना ज्येष्ठ अभिनेते गोखले यांनी परखड मत व्यक्त केले.

हेही वाचा: नजर कैदेत असल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा!

अभिनेते गोखले म्हणाले, "जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने देशहिताला प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येक माणूस आपल्यातच गुरफटत गेला आहे. पुर्वीच्या राजकारणात जो मानवतावाद होता, तो आजच्या राजकारणात दिसत नाही. पुर्वी जे माणूस केंदीय, देश केंद्रीय राजकारण होत, ते आता सत्ता केंद्रीय राजकारण होताना दिसत आहे.'' मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी आभार मानले.

loading image
go to top