esakal | नजर कैदेत असल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा; काश्मीरच्या स्थितीवर म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Mehbooba Mufti

नजर कैदेत असल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा!

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आपण नजरकैदेत असल्याचा दावा केला आहे. खोऱ्यातील परिस्थिती खराब असल्याचं सांगत प्रशासानं आपल्याला घरातून बाहेर पडण्यास मनाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरुन काश्मीर खोऱ्यात सर्वकाही सुरळीत असल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा असल्याचंही त्या म्हणाल्या.

मुफ्ती यांनी नजरकैदेत असल्याचा दावा अशा वेळी केला आहे. ज्यावेळी काश्मीरमध्ये सुरक्षा स्थितीवरुन अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. फुटिरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांचं बुधवारी निधन झाल्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा: विधानसभेसाठी मायावतींची जुनीच रणनीती; ब्राह्मण मतांवर 'लक्ष्य'

मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्याला नरजकैदेत ठेवल्याचा दावा करताना एक ट्विट केलं असून यामध्ये त्यांनी आपल्या घराचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या घराबाहेर सशस्त्र सुरक्षा रक्षकांचं एक वाहन उभ असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी म्हटलंय की, सुरक्षेच्या कारणास्तव पीडीपी नेत्या मुफ्ती यांनी कुलगामच्या दौऱ्यावर जाऊ नये.

हेही वाचा: ब्राम्हण समाजाविषयी अपशब्द; मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची तुरुंगात रवानगी

९१ वर्षीय गिलानी यांचं बुधवारी निधन झालं होतं. यानंतर त्यांचं पार्थिव श्रीनगर येथील त्यांच्या घराजवळचं दफन करण्यात आलं. यावेळी काही अनुचित घटना घडू नयेत यासाठी संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. काही भागांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती.

loading image
go to top