esakal | 'राज्य सरकार अडकले कंगनात', प्रवीण दरेकर यांची टीका 
sakal

बोलून बातमी शोधा

'राज्य सरकार अडकले कंगनात', प्रवीण दरेकर यांची टीका 
  • लोणावळ्यात कोविड महासर्वेक्षण अभियानाला प्रारंभ 

'राज्य सरकार अडकले कंगनात', प्रवीण दरेकर यांची टीका 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : "राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. छोट्या शहरांसह ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. मात्र, राज्य सरकारला अजूनही जाग आलेली नसून सरकार आपल्या विसंवादात आणि कंगनात अडकले आहे,'' अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोणावळा नगरपरिषदेतर्फे सुरू असलेल्या कोविड महासर्वेक्षण अभियानाचा प्रारंभ दरेकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगरसेवक देविदास कडू, बाळासाहेब जाधव, वृंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरेकर म्हणाले, "राज्य सरकारला अजूनही कोविडला महत्त्व द्यावंसं वाटत नाही. जेवढं कंगणावर बोलतात, त्यातील चार वाक्‍य कोविडवर बोलली तरी जनतेला दिलासा मिळेल.'' नगरपालिकांना राज्य सरकार निधी देत नसल्याची खंत व्यक्त करत ज्या नगरपालिका कोविड विरोधात चांगले काम करत आहेत. त्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. येथील संजीवनी कोविड केअर सेंटरला भाजपतर्फे दरेकर यांच्या हस्ते व्हेंटिलेटर भेट देण्यात आला. महासर्वेक्षण अभियानास नगरपरिषदेने स्वतः पुढाकार घेतला असून, सहाशे स्वयंसेवकांची फौज उभी केली आहे, असे नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या. 
 

loading image