esakal | पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा

पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अल्पवयीन मुलांचे अपहरण करून मारहाण करीत त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरीतील रिव्हररोड येथे घडला.

सचिन सौदाई, सनी सौदाई, अजय टाक, जतिन मेवाती, अनिल पिवाल, जतिन टाक, तौसिफ़ सय्यद, कृष्णा बॉक्सर पारधे, वरूण टाक, कपिल टाक, आशिष ननावरे, जय पिवाल, विनय वेद, सद्दाम शेख, खलिल शेख, अरुण टाक, विजय चव्हाण, खुबचंद मंगतानी ऊर्फ बुगी , सोनू मंगतानी (सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: टेरेसवरून फेकून तरुणाचा खून; पिंपरीतील घटना

तीन महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने शुक्रवारी फिर्याद दिली आहे. पिंपरी भाजी मंडईत चोरी केल्याच्या संशयावरून तीन महिन्यांपूर्वी पहाटेच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीच्या अल्पवयीन मुलासह आणखी दोन अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून रिव्हररोडवरील विसर्जन घाटाकडे घेऊन गेले. तेथे शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व पट्ट्याने मारहाण केली. पाळलेले श्वानांना चावण्यासाठी त्यांच्या अंगावर सोडले. त्यांच्याशी अश्लील वर्तन करीत या भागात पुन्हा दिसायचे नाही व कुठेही तक्रार करायची नाही, अशी धमकी दिली.

loading image
go to top