पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाकडील सोन्याच्या अंगठ्या पळविल्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धकडील सोन्याच्या अंगठ्या पळविल्याची घटना राहाटणी येथे घडली. 

पिंपरी : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धकडील सोन्याच्या अंगठ्या पळविल्याची घटना राहाटणी येथे घडली. 
विलास पिराजी सोनवणे (वय 65, रा. नालंदा हाऊसिंग सोसायटी, शास्त्रीनगर, राहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मंगळवारी (ता. 29) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सनशाईन नगर येथे बस थांब्यावर असताना दोन जण त्यांच्या जवळ आले आम्ही पोलिस असल्याची बतावणी करून फिर्यादीला हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधून ठेवण्यास सांगितल्या. त्यानंतर चोरटे या अंगठ्या घेऊन पसार झाले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

शहरात काही दिवसांपासून मोबाईल चोरट्यांनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. पादचारी व्यक्तींना टार्गेट करीत मोबाईल हिसकाविले जात असून यामध्ये वृद्ध व्यक्तींकडील मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. भोसरी, पिंपळे गुरव, सांगवी, मोशी या भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना समोर आली. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घराबाहेर पडताना शक्यतो सोन्याचे दागिन्यांचे प्रदर्शन करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. 

हल्ला होण्याची भीती- वृद्धकडील ऐवज लुटल्यास समोरून प्रतिकार होण्याची शक्यता फारच कमी असल्याने चोरटे वृद्ध व्यक्तींना हेरतात. यामध्ये वृद्धाच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची भीती असते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक टार्गेट- चिंचवडमधील शाहूनगर येथे दोन दिवसांपुर्वी दोन वृद्धाकडील मोबाईल हिसकाविल्याच्या घटना घडल्या. यासह पिंपरीतील मोरवाडी येथेही चार दिवसांपूर्वी एका ज्येष्ठाला अडवून चोरत्यांनी त्यांच्याकडील मोबाईल व रोकड लुटली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime and theft increased in Pimpri