esakal | राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ
sakal

बोलून बातमी शोधा

mns1.jpg

वाढीव बिलांवरून महावितरणच्या शिरूरच्या कार्यालयात खळ्ळखट्याक करणाऱ्या आणि त्यासाठी तुरुंगात गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आपुलकीने दखल घेतली. "जागे रहा, तुमचे भविष्य उज्ज्वल आहे,' अशा शब्दांत त्यांनी मनसैनिकांना प्रोत्साहन दिले. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

sakal_logo
By
नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : वाढीव बिलांवरून महावितरणच्या शिरूरच्या कार्यालयात खळ्ळखट्याक करणाऱ्या आणि त्यासाठी तुरुंगात गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आपुलकीने दखल घेतली. "जागे रहा, तुमचे भविष्य उज्ज्वल आहे,' अशा शब्दांत त्यांनी मनसैनिकांना प्रोत्साहन दिले. 

...म्हणून महामेट्रोला जलसंपदा विभागाने पुण्यात ठोठावला दंड ! 

वीजग्राहकांना वाढीव बिले येत असल्याचा मुद्दा मनसेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुंशात कुटे व मनसे कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. मात्र, त्यांनी उडवाउडवी केली. त्यामुळे संतप्त मनसैनिकांनी "महावितरण'च्या कार्यालयात तोडफोड केली. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन या कार्यकर्त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी भोगावी लागली. नुकताच या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. त्यावेळीही राज ठाकरे यांनी दूरध्वनीवरून ख्याली- खुशाली विचारली होती व समक्ष भेटण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. 

पश्चिम बंगालमध्ये वाढले मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण; पुण्यातल्या अधिकाऱ्याची कमाल!

त्यानुसार या मनसैनिकांनी ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या "कृष्णकुंज' येथे त्यांची भेट घेतली. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्यासह मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे प्रदेश सचिव सचिन मोरे आदी उपस्थित होते. या धाडसी मनसैनिकांचा ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. जेलमध्ये काही त्रास नाही ना झाला, असे आस्थेवाईकपणे त्यांनी विचारले. न्याय मिळत नसेल, तिथे कायदा मोडावा लागतो. पर्यायाने कारावास देखील भोगावा लागतो. परंतु, यातून झालेल्या त्रासातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळते. आत्मचरित्राची पाने देखील वाढतात. जनहितासाठी व नवनिर्माणासाठी असेच नेहमी जागे रहा, अशा शब्दांत ठाकरे यांनी मनसैनिकांना प्रेरित केले. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

राजसाहेबांच्या भेटीने आम्हा सामान्य मनसैनिकांच्या देहात दहा हत्तीचे बळ संचारले असून, अन्यायाविरोधात लढण्याची ताकद नसानसात भिनली आहे. महावितरणच्या वाढीव बीलांवरून सुरू केलेले आंदोलन एकाअर्थी यशस्वी झाले असून, यापुढेही वाढीव बिले आल्यास किंवा वाढीव बिले भरण्यास नकार देणारांची वीजकनेक्‍शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास याहूनही उग्र आंदोलन छेडले जाईल. 
- अविनाश घोगरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिरूर शहर 

loading image
go to top