
चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलीस निरीक्षक, कर्मचारी जखमी
पिंपरी : रस्त्यावरील कार चोरट्यांनी चोरली. दरम्यान गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करुन चोरट्यांना अडवले. त्यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला. यामध्ये पोलीस किरकोळ जखमी झाले. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास निगडी-देहूरोड रस्त्यावर घडली.यमुनानगर परिसरातून चोरट्यां कार चोरली. दरम्यान गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड निगडीच्या दिशेने निघाले होते.
पोलीस गाडी पाहून तक्रारदार त्यांच्याकडे आला आणि कार चोरीला गेल्याचे सांगितले. जोगदंड आणि त्यांच्या सोबत असणारे पोलीस भक्ती-शक्ती चौकातुन जात असताना चोरीला गेलेली कार दिसली. पोलिसांनी पाठलाग सुरु केला. दरम्यान पोलिसांनी गाडी आडवी लावली. खाली उतरून निरीक्षक जोगदंड यांनी चावी काढण्यासाठी दरवाजाच्या खिडकीतून हात घातला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातावर मारहाण केली. चोरट्यांनी त्यांच्याकडील तलवार आणि चाकूने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
Web Title: Crime News Pimpri Thieves Attack Police Police Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..