esakal | वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलासह सुनेवर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

वृद्ध आई-वडिलांचा छळ करीत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी मुलासह सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चिंचवडमधील बिजलीनगर येथे घडला.

वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलासह सुनेवर गुन्हा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वृद्ध आई-वडिलांचा छळ करीत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी मुलासह सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चिंचवडमधील बिजलीनगर येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुलगा सचिन जगन्नाथ गिते (वय 41), त्याची पत्नी प्रियंका (वय 36, दोघेही रा. रघुमाऊली उद्यानाच्या बाजूला, बिजलीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जगन्नाथ सोनुती गिते (वय 75) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा सचिन व त्याची पत्नी प्रियंका हे सन 2016 पासून फिर्यादी व त्यांची पत्नी सुशीला (वय 65) यांना वारंवार शिवीगाळ, मारहाण करीत धमकी देतात. आरोपी सचिन याने वडिलांनी लाकडी बांबूनेदेखील मारहाण केली. दरम्यान, वृद्ध आई-वडिलांचे पालन-पोषण न करता त्यांचा छळ केल्याप्रकरणी आरोपींवर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायद्यांतर्गत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Edited By - Prashant Patil