
पिंपरीत टोळक्याकडून तरुणावर चॉपर, कोयत्याने वार
पिंपरी : जुन्या भांडणाबाबत सर्वाना सांगतोस काय, असे म्हणत टोळक्याने तरुणावर चॉपर व कोयत्याने वार केले. मोठमोठ्याने शिवीगाळ करीत कोयता हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी राहुल बापूराव टोणपे (रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत , मिलिंदनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल पवार (वय ३१, रा. पिंपरी), अक्षय येलवे (वय २१) यांना पोलिसांनी अटक केली आहेत. तर तन्वीर युसूफ शेख -घोडेवाला (वय २८, रा. काळेवाडी ), अतुल पवार (वय २८, रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी हे बुधवारी (ता. २०) रात्री साडे नऊच्या सुमारास मिलिंदनगर येथील एफ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभे होते. त्यावेळी 'काही दिवसांपूर्वी झालेली भांडणे सर्वाना सांगतोस काय' असे म्हणत आरोपीने त्यांना शिवीगाळ करीन धमकावले. कोयता, चॉपर व बांबूने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर मोठमोठ्याने शिवीगाळ करीत हातातील कोयता भिरकावून 'जर कोणी सोडविण्यास मध्ये आला तर त्याला सुद्धा खल्लास करतो' असे धमकावून दहशत माजवली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत
Web Title: Crime Update In Pimpri Attacked On Youth With Scythe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..