'तो' चोऱ्या करून धुमाकूळ घालायचा, आताही तो त्याच तयारीत होता अन्...

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

चोऱ्या करून धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे.

पिंपरी : चोऱ्या करून धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्यावर देहूरोड पोलिस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेऱ्या ऊर्फ ऋशीकेश राजु अडागळे (वय 21, रा. पदमावती मंदिरासमोर, उर्से, ता.मावळ ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. अडागळे हा सेंट्रल चौक, देहुरोड येथे येणार असून, तो गुन्हे करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार शोध पथक त्याठिकाणी दबा धरुन थांबलेले असताना अडागळे हा तेथे आला. त्याला पोलिसांचा संशय आल्याने तो तेथुन पळून जाऊ लागला असतानाच पथकाने त्याला ताब्यात घेतले. 

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

देहूरोड हद्दीत गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर देहूरोड पोलिस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी अकरा गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी त्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal arrested by crime branch police