esakal | दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ; पिंपरी-चिंचवडमधील विक्रेत्यांचा जीव भांड्यात
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ; पिंपरी-चिंचवडमधील विक्रेत्यांचा जीव भांड्यात
  • बाजारपेठेतील किरकोळ विक्रेत्यांचा जीवही भांड्यात पडला आहे. 

दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ; पिंपरी-चिंचवडमधील विक्रेत्यांचा जीव भांड्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शहरवासीयांनी सुस्कारा सोडला आहे. पावसात पडझड झाली. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. मात्र, आता सर्व सुरळीत झाले आहे. बाजारपेठेतील किरकोळ विक्रेत्यांचा जीवही भांड्यात पडला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

पिंपरी-चिंचवड बाजारपेठ गेल्या पाच दिवसांपासून बहरली आहे. पणत्या, रांगोळी, रांगोळीचे विविध डिझाईन्स व छाप, कापूस, अत्तर, सुगडी, शुभ-लाभ, लक्ष्मीची पावले, कापूस, वाती विक्रीस आल्या आहेत. फिरत्या विक्रेत्यांकडेही विविध गृहोपयोगी वस्तू मिळत आहेत. दहा रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत किरकोळ वस्तूंच्या किमती आहेत. विक्रेतेही रोजच्या कमाईकडे आस लावून बसले आहेत. दुकानांची दालने सजली आहेत. कापड व इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठेतही गर्दी वाढली आहे. होलसेल दुकानात किराणा खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. बऱ्याच हौशी ग्राहकांची ऑफरवरच नजर आहे. आवश्‍यक वस्तू खरेदीसाठी प्रत्येक दुकानातील योग्य दर विचारात घेऊनच नागरिकांची खरेदी सुरू आहे. दुकानांबाहेर लागलेल्या ऑफर आणि बुकिंग सवलतीच्या जाहिराती पाहून गिऱ्हाईक दुकानांकडे वळत आहेत. मोबाईल, लॅपटॉप व इतर आवश्‍यक इलेक्‍ट्रीक वस्तूंची आकर्षक ऑफरमुळे ऑनलाइन बुकिंग केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्राहक फक्त पणत्यांच्या किमतीबाबत विचारपूस करतात. आता पाऊस उघडल्याने दुकान लावले आहे. मात्र, अजून विक्री झाली नाही. 
- मालन शेख, विक्रेता, पिंपरी 

दसऱ्यानंतर दरवर्षी विक्री जोरात असते. पण, यंदा अद्याप व्यवसाय थंड आहे. दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. पण, गिऱ्हाईकच नाही. पणत्या व रांगोळी विक्रीतून रोज दोन-चारशे रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. 
- सुग्रभी आत्तार, विक्रेत्या, काळेवाडी