ख्रिसमस सेलिब्रेशनचा पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साह; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 

ख्रिसमस सेलिब्रेशनचा पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साह; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 

पिंपरी : कोरोनामुळे धाकधूक आणि तणावामध्ये वर्षाची सांगता न होता ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. ‘मेरी ख्रिसमस’ची स्टिकर, विविध आकारांतील बेल, विविधरंगी स्टार, घरामध्ये व अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विद्युत माळा, अशा ख्रिसमस स्पेशल साहित्याने बाजारपेठ सजली आहे. ख्रिस्तीबांधवांचा सण म्हणजेच ‘नाताळ’ अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने घराला रंगरंगोटी करणे, आकर्षक सजावट करणे, यासाठी धावपळ सुरू असून, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

नवीन वर्षाची चाहूल घेऊन येणारा ख्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला, तरी वर्षानुवर्षे तो सगळ्यांचेच आकर्षण ठरला आहे. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त गेल्या आठवड्यांपासून शहरात उत्साही वातावरण आहे. शहरात सुमारे छोटे-मोठे ५० प्रोटेस्टंट आणि कॅथलिक चर्च आहेत. साधारण: तीन लाख मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, तमीळ, असे बहुभाषिक ख्रिस्ती बांधवांची संख्या आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडकर सज्ज झाले असून, शुक्रवारी (ता. २५) नाताळनिमित्त विविध चर्चमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या सर्व चर्चने रोषणाई केली आहे. नाताळजवळ आल्यामुळे ख्रिस्ती बांधवांची घराला रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. आता आकर्षक सजावट करण्यासाठी धावपळ सुरू आहे.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुकानासमोर मोठे सांताक्‍लॉज 

नाताळची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दुकानासमोर मोठे सांताक्‍लॉज मांडले असून, दुकानाबाहेर विविध आकारातील स्टार लावले आहेत. बाजारात लहान मुलांसाठी सांताक्‍लॉजची आकर्षक खेळणी, विविध रंगी शोभेच्या वस्तू, स्टार, विद्युत माळा बाजारामध्ये उपलब्ध असणारे हे ख्रिसमस स्पेशल साहित्य ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा सांताक्‍लॉजची टोपी, सांतामास्क, चष्मा, हेअरबॅंड, टोप्या घेऊन फिरणारे विक्रेते लहान मुलांचे लक्ष वेधत आहे.

चर्चमध्ये धार्मिक उत्सवांचे नियोजन

प्रत्येक चर्चने ख्रिस्ती बांधवांसाठी मुख्य प्रार्थनेचे नियोजन केले आहे. पिंपरीमधील अवरलेडी कन्सोलर चर्चमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ७ ते ८ आणि ८ ते ९ वाजता विभागवार ‘वॉच नाइट’ची उपासना करण्यात येईल. नाताळच्या दिवशी सकाळी ६, ७, ८ आणि ९ या वेळेत मिस्सा होईल, अशी माहिती फादर अमृत फन्सेका यांनी दिली. कामगारनगरमधील दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट चर्चमध्ये सरकारचे नियम पाळून नियोजन केल्याचे पास्टर सुधीर पारकर यांनी सांगितले. पिंपरीगावातील हिंदुस्तानी कॉन्व्हेंट चर्चदेखील सज्ज झाल्याची माहिती पास्टर येशूदास कालेकर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केकला मागणी

ख्रिसमस आणि केक हे समीकरणच असल्याने शहर परिसरातील आणि उपनगरातील नामवंत बेकऱ्यांमध्ये केकचे विविध प्रकार दाखल झाले आहेत. भेट देण्यासाठी विविध आकारातील चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, स्ट्रॉबेरी, कॉफी विथ क्रीम, पाइनापल फ्लेवरमधील कुकीज आणि चॉकलेट्‌सही विक्रेत्यांनी उपलब्ध केली आहेत. 

मॉल सजले 

ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहरातील मोठमोठ्या सात मॉलबरोबरच लहान दुकाने, हॉटेलवर बाहेर केलेली रोषणाई, सजविलेले ख्रिसमस ट्री सगळ्यांचे आकर्षण ठरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com