पिंपरी : ‘वायसीएम’मधील सीटी स्कॅन मशिन बंद

पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सीटी स्कॅन यंत्रणा मागील १५ दिवसांपासून बंद
CT scan machine off Yashwantrao Chavan Memorial Hospital pimpri
CT scan machine off Yashwantrao Chavan Memorial Hospital pimpri SAKAL

पिंपरी - पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सीटी स्कॅन यंत्रणा मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने गोरगरिबांना तातडीच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. शिधापत्रिकेवर मोफत उपचार होणाऱ्या गरजूंना सीटी स्कॅनसाठी नाहक अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.

वायसीएममध्ये असणाऱ्या रूबी एलकेअरमार्फत रुग्णांचे सीटी स्कॅन केले जाते. अपघातग्रस्त, तातडीचे व जोखमीच्या रुग्णांचे तत्काळ सीटी स्कॅन आवश्यक असते. अशावेळी पिवळी शिधापत्रिका असणाऱ्यांना सीटी स्कॅन मोफत आहे. तसेच, इतर रुग्णांना सीटी स्कॅनसाठी १२०० रुपये खर्च येतो. मात्र, सध्या खासगी रुग्णालयात या उपचारासाठी अडीच ते तीन हजार रुपये रुग्णांच्या नातेवाइकांना मोजण्याची वेळ आली आहे.

श्रीमंत महापालिकेत शहराबाहेरील रुग्णही अत्यल्प दरात उपचार मिळत असल्याने उपचारासाठी येत असतात. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत वायसीएममध्ये कमी दरात व सवलतीत सीटी स्कॅन करून मिळते. दिवसाकाठी २५ ते ३० रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. यातील काही अत्यवस्थ असतात. त्यांना इतरत्र हलवता येत नाही. त्यामुळे, रुग्णांना नाहक त्रास होत असल्याने नातेवाइकांनी हळहळ व्यक्त केली. तसेच, या कामकाजाचे कंत्राट संपले असल्याची चर्चा आहे. याचे पुन्हा नव्याने कंत्राट काढावे लागणार असल्याची माहिती मिळाली.

येथील मशिन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. माझ्या आईला हाडाच्या उपचारासाठी वायसीएममध्ये दाखल केले आहे. तिला चालता येत नाही, त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी हलविणे अवघड झाले. त्यामुळे मी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी गेलो. त्या ठिकाणी काही अंशी सवलत असल्याने मला ८२५ रुपये खर्च आला. मात्र, इतर ठिकाणी गेलो असता, अधिक पैसे मोजावे लागले असते. रुग्णांची गैरसोय होऊ नये याचे पूर्वनियोजन वायसीएम प्रशासनाने करायला हवे.

- राकेश तरडे, दत्तनगर, चिंचवड, रुग्णाचे नातेवाईक

दहा तारखेपर्यंत नवीन ट्यूब आल्यानंतर मशिन सुरू होणे अपेक्षित आहे. साधारणत: १५ ते २० दिवसांपासून मशिन बंद आहे. या ट्यूबची किंमत ४० ते ५० लाख आहे. परदेशातून ती मागवली आहे. त्यामुळे, थोडा वेळ लागला आहे.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com