पिंपरीमध्ये ‘स्थायी’च्या अध्यक्षपदी संतोष लोंढे कायम राहणार की बदलणार, याची उत्‍सुकता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचा एक वर्षाचा कार्यकाल फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार? शहराचे कारभारी कोणत्या सदस्याला संधी देतात? की आहे त्याच अध्यक्षांना मुदतवाढ देतात, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचा एक वर्षाचा कार्यकाल फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार? शहराचे कारभारी कोणत्या सदस्याला संधी देतात? की आहे त्याच अध्यक्षांना मुदतवाढ देतात, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

‘दादां’नो, आता शहराकडे लक्ष घालाच!

महापालिकेची सत्ता २०१७ मध्ये भाजपच्या हाती आली. तेव्हापासून एक-एक वर्षांच्या कालावधीसाठी चार नगरसेवकांना आतापर्यंत स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांनी गेल्या वर्षी मार्चपासून सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात कोरोनाचे रुग्ण शहरात आढळले आणि तिसऱ्या आठवड्यात लॉकडाउन झाले. खर्चावरही मर्यादा आल्या. सरकारच्या आदेशानुसार महापालिका अर्थसंकल्पाच्या ३३ टक्के निधीच खर्च करण्याचे नियोजन करावे लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक झाले. स्थायी समितीच्या दर आठवड्याच्या बैठकीवर मर्यादा आली. मात्र, ऑक्‍टोबरपासून लॉकडाउनचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले आणि नोव्हेंबरपासून स्थायीच्या बैठकी सुरू झाल्या. सभापती लोंढे यांच्या मतानुसार गणसंख्येअभावी सभा तहकूब कराव्या लागल्या. त्यांचा कार्यकाल २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी सात बैठकी होऊन त्यात निर्णय होणे अपेक्षित आहे. शिवाय, अध्यक्षपदासाठी अन्य इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे.

वाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

गेल्या वर्षीचे रेकॉर्ड तोडणार
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पाच व फेब्रुवारी महिन्यात सात सभा झाल्या. फेब्रुवारीतील चार सभा नियमित, काही तहकूब व काही विशेष सभा घेण्यात आल्या. यातील एक सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती, त्यामुळे ती आजही चर्चेत आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष गेल्या वर्षीच्या अध्यक्षांच्या काळातील रेकॉर्ड तोडणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curiosity Santosh Londhe remain permanent chairman Pimpri or change