वाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची एक बस उदगीर येथून मुंबईला जात होती. पहाटे चारच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ बस व मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. पावणे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.

पिंपरी : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ मुंबई मार्गावर खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील क्लीनरचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवारी (ता.11) पहाटे झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बजरंग गायकवाड (वय  35) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 8 जखमी प्रवाशांपैकी 6 जणांना औंध रुग्णालयात तर 2 प्रवाशांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची एक बस उदगीर येथून मुंबईला जात होती. पहाटे चारच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ बस व मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. पावणे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.

पुणे : 2 फरार आरोपी जेरबंद; बिनविरोध निवडून आल्यावर केला होता हाफ मर्डर

त्यानुसार मुख्य अग्निशमन विभागाची एक व राहटणी उपविभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died in Private travels and truck accident near Wakad Bridge