esakal | Video :...अन्‌ निसर्गातील बदल टिपायला मिळाली उसंत!
sakal

बोलून बातमी शोधा

Video :...अन्‌ निसर्गातील बदल टिपायला मिळाली उसंत!

- सध्या दुर्मिळ पक्षी नजरेस पडू लागले आहेत.

Video :...अन्‌ निसर्गातील बदल टिपायला मिळाली उसंत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : धकाधकीच्या जीवनात नागरिकांना निसर्गातील बदल टिपायला कधी नव्हे, ती उसंत मिळाली आहे. शहरी कोलाहलात पक्ष्यांचा किलबिलाट, गाणी सहज कानी पडू लागले आहेत. औद्योगिक नगरीतील यंत्रांचा बंद झालेला खडखडाट व वाहनांची वर्दळ कमी झाल्याने पावशा आणि कारुण्य कोकीळ हे सहज न दिसणारे पक्षी सर्वांच्या नजरेस पडू लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील पाणवठे पक्ष्यांसाठी स्वच्छ झाल्याने स्थानिक पक्ष्यांचा वावर शहरात मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागला आहे. थेरगाव व चिंचवडगावातील पाणवठ्यावर कवड्या धिवर, छोटा धिवर, छोट्या खंड्या, मध्यम बगळा, मोठा बगळा, प्लवा बदक, छोटा व मोठा पाणकावळा, चित्रबलाक, अडकित्ता, ब्राम्हणी मैना हे पक्षी स्वच्छ पाण्यामुळे पाणवठ्याभोवती घिरटे घालू लागले आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कधीही मानवी वस्तीत न दिसणारे लाल बुलबुल व लाल शिपाई यांनी घराच्या आजूबाजूस घरटी बांधण्यास सुरवात केली आहे. शिंपी, दयाळ, चीरक, नाचण, राखी, वटवट्या हे नेहमीचेच पक्षी. परंतु, वाहनांची वर्दळ कमी झाल्याने ते चक्क स्वत: रस्ता ओलांडून जात आहेत. चिखली घरकुलातील संजय सापरिया यांनी घरटे बांधण्यापासून ते पिल्ले उडण्यापर्यंतची शिपाई बुलबुलची सर्व निरीक्षणे कॅमेऱ्यात टिपली आहेत.

दुर्मिळ 'स्वर्गीय नर्तक'चे दर्शन 
अगदीच दुर्मिळ आढळणारा लांब शेपटीचा आणि पांढऱ्या रंगाचा आकर्षक स्वर्गीय नर्तक (पॅराडाईज प्लाय केचर) पक्षी तळेगावमध्ये आढळला आहे. सहसा मनुष्य वस्तीत हा पक्षी येत नाही. याशिवाय मुनिया, दयाळ, साळुंक्‍यांचा वावर शहरात वाढला आहे. त्यामुळे या पक्ष्यांचा किलबिलाट सध्या नागरिकांना सुखावह वाटत आहे. पहाटेच्या नियमित वेळेपेक्षा कोकिळा, सनबर्डस, रातवा, गवा या पक्ष्यांचा सुंदर चिवचिवाट कानी पडत असल्याचे फ्रेडंस ऑफ नेचरचे पक्षी निरीक्षक महेश महाजन यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शहरातील ऐंशी टक्के प्रदूषण घटल्याने सर्वत्र शांतता व आल्हाददायी वातावरण आहे. माळरानात दिसणारे पक्षी शहरात दिसू लागले आहेत. कंपन्यांचे सांडपाणी कमी झाले आहे. माणसांची वर्दळ कमी झाल्याने शहरातील रिकाम्या घरात व जागेत प्रथमच पक्षी घरटी तयार करत आहेत. नागरिकांनी पुढेही असंच पर्यावरण जपावं."
- उमेश वाघेला, पक्षी अभ्यासक, अलाईव्ह संस्था, निगडी

loading image