Gas Cylinder Blast
Gas Cylinder BlastSakal

बेकायदेशीर गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट

बेकायदा घरगुती सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस रिफलिंग करताना गॅस गळती झाल्याने गॅसने पेट घेऊन मोठा स्फोट झाला.

पिंपळे गुरव - पिंपळे गुरव येथील मोरया पार्क गल्ली नंबर ५ मध्ये जांभुलकर चाळीत दुपारी साधारण साडे बाराच्या सुमारास बेकायदा घरगुती सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस रिफलिंग करताना गॅस गळती झाल्याने गॅसने पेट घेऊन मोठा स्फोट झाला. यामध्ये दोन जण रमेश मनाराम व कुमार दिलीप सुखाराम हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

प्रत्यक्ष दर्शनी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोरया पार्क येथील जांबुळकर चाळी मध्ये भारत गॅस एजन्सीचे रमेश मनाराम व कुमार दिलीप सुकाराम घरगुती सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये बेकायदेशीर गॅस भरत असताना गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोट खूप मोठा असल्याने घराच्या खिडक्या फुटल्या व भिंतीना तडे जाऊन भिंती एका बाजूला कलल्या गेल्या.घराचा दरवाजा पंधरा ते वीस फूट लांब उडून पडला गेला.

अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाहीत. अखेर अग्निशामकच्या जवानांना घटणास्थळी दुचाकीवरून जावे लागले. ही वाहने तब्बल ७०० मीटर अलीकडेच थांबवावी लागली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्या साठी रुग्णवाहिका वेळेत दाखल झाल्या. मात्र, त्याही घटनास्थळी जाऊ शकल्या नाहीत.

Gas Cylinder Blast
धोक्याचा इशारा : पारव्यांमुळे गंभीर आजाराची भीती

पॉईंटर -

- रस्ता अरुंद असल्याने रुगवाहिका व अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी पोहचू शकल्या नाहीत.

- घटनेची दुसऱ्यांदा पुनरावृत्ती

- परिसरात सर्रास गॅस चोरी

- घरगुती गॅस धारकांनवर कमी गॅस मिळत असल्याने अन्याय

झालेला प्रकार हा दुर्दैवी असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच भाडेकरू असल्याची पोलीस ठाण्यात नोंद केली नसेल, तर घरमालका वरही गुन्हा दाखल केला जाईल

- सुनील टोनपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन

अशी घटना या पूर्वीही येथे झाली होती. हा घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. मुळात अनधिकृत पणे गॅस भरण्याचे काम चाललेले होते. गॅस भरणे हा चोरीचाच हा प्रकार आहे. तसेच येथील भागात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका पोचू शकली नाही.

- शशिकांत कदम, नगरसेवक पिंपळे गुरव

संपूर्ण चाळच अनधिकृत आहे. मालक फक्त घरभाडे घ्यायला येतात.येथे बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर भरून दिले जात होते याकडेही चाळ मालकाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.नागरिकांना प्रशस्त रस्ता करून देणे आवश्यक आहे.अग्निशामक विभागाची वाहने व रुग्णवाहिकाही इथे पोहोचू शकलेली नाही, हे दुर्दैव. त्यामुळे या दुर्घटने प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

- राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com