धोक्याचा इशारा : पारव्यांमुळे गंभीर आजाराची भीती

डॉक्टरांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडेही नागरिकांचे दुर्लक्ष
पारव्यांमुळे गंभीर आजाराची भीती
पारव्यांमुळे गंभीर आजाराची भीतीSakal

पिंपळे गुरव : नवी सांगवी येथील बस स्टॉप समोरील खुल्या मैदानात काही नागरिक सकाळच्या वेळी पारवे-कबुतरे यांना धान्य खायला घालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही नागरिक भरभरून धान्य टाकत असल्याने ते खाण्यासाठी पारव्यांचे थवेच्या थवे याठिकाणी जमा होताना दिसून येत आहे. या पक्ष्यांना खायला घातल्यामुळे पुण्य मिळत असल्याच्या समजुतीतून डॉक्टरांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष केलं जातं आहे.

पोटभर खाऊन झालं की, हे पारवे शहरातील इमारतींचा आसरा घेतात. कुणाच्या गॅलरीमध्ये तर कुणाच्या गच्चीवर त्यांचा वावर असतो. अनेकदा तर हे पारवे घरातही प्रवेश करतात. या पारव्यांची पिसं आणि विष्ठेमधून अनेक आजार बळावत असल्याचे समोर आले असल्याने येथील नागरिकांनी त्याबाबदल कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांन मधून केली जात आहे.

पारव्यांमुळे गंभीर आजाराची भीती
राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात आढळला नाही ओमिक्रॉनचा रुग्ण

हायपर सेन्सेटिव्ह, न्यूमोनिया, दमा असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्यास हे पारवे कारणीभूत ठरत आहेत. रुग्णाचं फुफ्फुस आकुंचन पावणं, बोलताना दम लागणं अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं आणि कित्येकदा तर नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे वेळ येत असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. खरंतर मोकळ्या मैदानातील जागांमध्ये पक्ष्यांना खायला टाकू नये, याबद्दल आधीच ठिकठिकाणी सूचना केलेल्या आहेत.

अनेक ठिकाणी तसे बोर्डही लावलेले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पक्ष्यांना हानिकारक असलेल्या पारव्यांना भरभरून खायला दिलं जात. त्यामुळे नवी सांगवी परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पारव्यांमुळे श्वसनाचे त्रास होतात, तर काही नागरिक त्यांना धान्य देतात. नागरिकांना आपण महानगरपालिकेकडून कारवाई म्हणून फक्त आवाहन करू शकतो. धान्य हे विभागून टाका, एकाच जागी नको; पण त्यांच्यावर काही ठोस कारवाई करू शकत नाही.महापालिकेच्या स्तरावर अशी उपाय योजना करणे अवघड आहे.

- घनश्याम पवार, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, पशुवैद्यक, महापालिका

पारव्यांमुळे गंभीर आजाराची भीती
पिंपरी : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मावळात ४३ अर्ज दाखल

पारव्यांमुळे श्वसनाचे आजार पसरतात. लोकांनी खाणे देणे बंद केले, तर त्या पारव्यांची कमी होण्यास मदत होईल. पक्षी हा स्वतःचा दाना-पाणी स्वतःच शोधत असतो. आपण त्यांना आळशी बनविले आहे. त्यामुळे त्यांना आयते खाण्याची सवय लागून जाते.

- विनायक बदडे, पक्षीमित्र

आम्ही पक्ष्यांना अन्नधान्य खाऊ घालतो. आम्हाला पुण्य लागो ना लागो; पण आमच्या मनाला समाधान नक्कीच मिळते. आम्ही लवकरच या पक्ष्यांसाठी विभागणी करून धान्य टाकण्याची योजना करणार आहोत.

- संजय मराठे, संजय गांधी निराधार योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com