
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात १९ ते २२ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक नजर अंदाजानुसार सुमारे दीडशे गावांतील बाराशे हेक्टरवरील भातासह इतर खरीप पिकांचे व सुमारे तीस गावांतील अडीचशे हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली. (Damage of twelve hundred hectares of crops in Maval taluka)
या नुकसानीच्या भरपाईसाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही भागात पूरस्थिती अद्याप कायम असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यताही आहे. मावळ तालुक्यात तीन-चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे खरीप पिकांचे विशेषतः भात पिकाचे मोठे नुकसान झाले. पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतजमिनीचेही नुकसान झाले.
मावळ तालुका कृषी विभागाने प्राथमिक नजर अंदाजानुसार या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानुसार अतिवृष्टीचा वडगाव, खडकाळा व कालेकॉलनी या तीन मंडल विभागांना मोठा फटका बसला आहे. या तीनही विभागातील १३२ गावांतील दोन हजार ४५६ शेतकऱ्यांच्या एक हजार ५८ हेक्टरवरील भात पिकाचे, वडगाव व कालेकॉलनी या दोन विभागातील ३७ शेतकऱ्यांच्या ४६ हेक्टरवरील भुईमुगाचे, ९२ शेतकऱ्यांच्या १०८ हेक्टरवरील सोयाबीनचे तर १८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले. एकूण दोन हजार ६३४ शेतकऱ्यांच्या एक हजार १९१ हेक्टर क्षेत्रावरील भातासह इतर खरीप व बागायती पिकांचे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.