esakal | पैलवान झाला बिझनेसमन; 'हेल्दी' व्यवसायाची अनोखी कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

pailwan

पैलवान झाला बिझनेसमन; 'हेल्दी' व्यवसायाची अनोखी कहाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खळद : बेलसर (ता. पुरंदर) येथील विशाल उर्फ भाऊसाहेब जगताप यांचा वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्या अनेक पिढ्या हाच व्यवसाय करत आहेत. मात्र, कोरोना (corona) काळात हा व्यवसाय संकटात सापडला. यामुळे पहिलवान असलेल्या विशाल यांनी मुदगल (मोगरी) बनविण्याचा निर्णय घेतला. कुस्ती (kushti) क्षेत्रातील मित्रांच्या मदतीने मुदगलीची विक्रीत करून नव्या व्यवसायाची उभारणी केली. (pailwan starting new business Unique and Healthy story )

व्यायामाला प्रोत्साहन मिळण्यासाठी विशाल मुदगल हॉटेलवर विक्रीसाठी ठेवले असता अनेकांनी त्याची मागणी केली. त्याप्रमाणे ते मुदगलची निर्मिती करत गेले. काही दिवसातच विक्रमी विक्री झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेजसमोर मुलांसाठी रस्त्यावर स्टॉल लावला. तिथेही उत्तम प्रतिसाद मिळाला. यासाठी त्यांचे मित्र जाबीर मुजावर साथ मिळाल्याचेही विशाल यांनी सांगितले.

हेही वाचा: पंचनामा : आपुलकीने बायकोला घास भरवा अन्‌ प्रेमाला वय नसतं, हे दाखवा

मल्लविद्येत मुदगल/मोगरी फिरवणे हा एक व्यायामप्रकार महत्वाचा मानला जातो. मुदगल अथवा मोगरी तसेच काही ठिकाणी गदा फिरवणे असेही याचे उच्चार पहायला मिळतात. मुदगल ही मुळात युद्धशास्त्रातील शस्त्र होय. फार दूरवर न जाता शिवकालीन युद्धशास्त्रात जो गुर्ज वापरला जात असे. तो गुर्ज म्हणजे मोगरीचे रूप होय. फरक इतकाच की गुर्ज पोलादी असून त्याच्या पुढे पोलादी व धारदार पाकळ्या असतात. समोरासमोर केल्या जाणाऱ्या हातघाईच्या युद्धात प्रतिपक्षाच्या पायदळाच्या डोक्यावर असणारे शिरस्त्राण अर्थात हेल्मेट फोडणे हा या शस्त्राचा प्रमुख उपयोग होय. शिवकाळात गावोगावी असणाऱ्या तालमी म्हणजे जणू युद्ध प्रशिक्षण केंद्रे असायची. यात जवान कुस्ती व इतर युद्धाला पूरक व्यायामप्रकार करायचे व त्यातील लाकडी मोगरी फिरवून गुर्जाचा अभ्यास करायचे.

हेही वाचा: उरुळीवर चिकुनगुनिया, डेंगीचे सावट

मुदगल/मोगरी फिरविण्याचे फायदे...

  • मजबूत शरीरयष्टी

  • शरीराला बळकटी मिळते

  • अनेक रोगांपासून संरक्षण

  • पिळदार शरीरयष्टीस उपयुक्त

  • शरीरातील सर्व स्नायूंची ताकद वाढते

हेही वाचा: पुणे : भरलेल्या बसमध्ये अंतर राखायचे कसे?

याबाबत बोलताना विशाल जगताप यांनी सांगितले, "आजवर काम करत असताना जो आनंद मिळाला नाही, तो मुदगलची निर्मिती व विक्रीतून मिळाला. यामुळे अनेक पहिलवान आणि वस्तादांशी संपर्क येतो. तरुण पिढी बलशाली करण्यासाठी मी खारीचा वाटा उचलत आहे, याचे मोठे समाधान आहे."

loading image
go to top