
Pune Traffic
sakal
अमोल शित्रे
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क ते पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या डांगे चौक येथील ‘ग्रेड सेपरेटर’ अर्थात समतल विलगकाची लांबी वाढविण्यात येणार आहे. डांगे चौकातून थेरगाव गावठाणात जाण्यासाठी उजवीकडे वळताना येथे वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी या ‘ग्रेड सेपरेटर’चा विस्तार करण्यात येणार आहे.