डांगेचौक हिंजवडी रस्ता जाम, दोन तास वाहतूक कोंडी | Traffic Jam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांगेचौक हिंजवडी रस्ता जाम, दोन तास वाहतूक कोंडी
डांगेचौक हिंजवडी रस्ता जाम, दोन तास वाहतूक कोंडी

डांगेचौक हिंजवडी रस्ता जाम, दोन तास वाहतूक कोंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड - आयटी पार्क हिंजवडीकडे जाणारा डांगे चौक हिंजवडी रस्ता मंगळवारी (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास दोन तास जाम झाला. ऐन कामावरून घरी जाण्याच्या वेळेस ही वाहतूक कोंडी झाल्याने तब्बल दोन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या तर अनेकांना सुमारे तासभर अडकून पडावे लागले ही वाहतुक कोंडी का झाली याचे कारण समजू शकले नाही.

दुपारी चारच्या आसपास अनेकांची सेकेंड शिप सुटते त्यामुळे बहुतेक वाहने रस्त्यावर आली मात्र पाहता पाहता रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढून रांगाच रांगा लागल्या. डांगे चौकापासून भूमकर चौक काळा खडकपर्यंत वाहतुक जाम कोंडी झाली. अनेक वाहनचालकांनी, स्थानिकांनी वाहने उभी करून वाहतूक कोंडी हटविण्याचा व वाहतुक नियमन करण्याचा प्रयत्न केला काही वेळाने वाहतूक पोलीस देखील दाखल झाले.

अखेर रात्री आठच्या सुमारास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. याबाबत सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर म्हणाले ही पीक वेळ असून निर्बंध शिथिल झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे त्यात अनेक पोलीस बंदोबस्तावर असल्याने अशी समस्या उद्भवते.

loading image
go to top