पावसाळ्यात नाणे मावळातील 'हे' पूल काळजात धडकी भरवितात!

पावसाळ्यात नाणे मावळातील 'हे' पूल काळजात धडकी भरवितात!

करंजगाव (ता. मावळ) : नाणे मावळातील दुर्गम भागांना जोडणाऱ्या पुलांची दुरवस्था झाली आहे. उंचीने कमी असल्याने पावसाळ्यात यंदा हे पूल पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने वडीवळे व वळवंती या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल धोकादायक बनले आहेत, तर नाणे-कामशेत पूल बिनकामाचा ठरत आहे.

वडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, खांडशी, नेसावे, वेल्हवळी, मुंढावरे व उंबरवाडी या गावांना कामशेत शहराला जोडून देणारा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. या भागाकडे जाताना हा एकमेव मार्ग आहे. दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असतो. मावळातील हा भाग पश्चिम भागात असल्याने या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. याशिवाय लोणावळा भागातील पावसाचे पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रातून या भागातच येत असते. परिणामी वडीवळे गावातील हा पूल दरवर्षी दहा-बारा दिवस पाण्याखालीच असतो. अतिवृष्टीच्या काळात या आठ गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. शाळकरी मुले, कामगार, दूध व्यावसायिक यांना आपल्या कामावर पाणी सोडावे लागते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोवित्रीजवळील खडकीचा पूल, वळवंती, वडवली, भाजगाव, उंबरवाडी, कोळवाडी, शिरदे, सोमवडी, थोरण, जांभवली, शिरोता धरण, श्री क्षेत्र कोंडेश्वर, ढाक बहिरी या दुर्गम भागातील गावांना जोडणारा पूल अत्यंत नाजूक अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 

छोटे व धोकादायक पूल

सद्य:स्थितीला हे पूल खूपच अरुंद आहे. एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. दररोजची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या तुलनेने पूल मजबूत स्थितीत नाही. तसेच, नवीन उंच व रुंद पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नाणे-कामशेत पूल

इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास कामशेत-नाणे रस्त्यावर पाणी साचून नाणे मावळातील नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊंड, कचरेवाडी, कांबरे, करंजगाव, मोरमारेवाडी कोंडीवडे, गोवित्री, पाले, उकसान, वडवली, वळवंती, भाजगाव, कोळवाडी, सोमवडी, थोरण व जांभवली या गावांचा संपर्क तुटतो. नाणे रोडवरील इंद्रायणी नदीवरील नविन बांधण्यात आलेल्या पूल उंच असूनही, नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हा पूल उंच आहे, परंतु नदीपात्रात पाणीपातळी वाढल्यानंतर या पुलाचा भराव पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतो. परिणामी रोडवर नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. यामुळे पूल मोकळा असूनही दरवर्षी वाहतूक पुर्णपणे ठप्प होते.

महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

सुमारे पस्तीस  गावातील नागरिकांच्या दररोजच्या वाहतुकीच्या वाटेतील हा गंभीर प्रश्न आहे. पावसाळ्यात या छोट्या पुलामुळे नागरिकांच्या जीवनातील दरवर्षी दहा-बारा दिवस व्यर्थच जातात, अशा महत्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com