सिग्नल नसल्याने रावेत चौकात धोका | Pimpri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

सिग्नल नसल्याने रावेत चौकात धोका

आकुर्डी : रावेत येथील ‘श्री संत तुकाराम महाराज’ पुलाजवळील चौकात सिग्नल बंद असतो. कधी कधी पूर्ण दिवसभर तो सिग्नल बंदच असतो. या चौकात वाहनांची वर्दळ ही जास्त असते. सिग्नल बंद झाल्याने नागरिक कशाही गाड्या चालवतात. त्यामुळे तो धोकादायक होत आहे.

या भागात सकाळी आणि सायंकाळी पाचनंतर मोठ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बीराटी रस्त्यातूनही चारचाकी आणि दुचाकी गाड्या जातात. अनेकदा बस येण्याची वेळ आणि दुचाकी, चारचाकी येण्याची वेळ एक होते. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असते.

सिग्नल बंद झाल्यावर वाहने शिस्तीत चालविल्या जात नाही. उलट त्या ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवत बसतात. दुचाकीवरून येणारी कॉलेजची मुले कशाही पद्धतीने गाड्या घेऊन जातात. कधी कधी तर सिग्नल तोडून फरारी होतात.

- प्रशांत काकडे, नागरिक

सिग्नल बंद झाल्यावर आम्ही लगेच आमच्या वरिष्ठांना कळवतो. गर्दी होऊ नये किंवा कोणी नियम मोडू नये म्हणून आम्ही नेहमी सतर्क असतो. नियम मोडणाऱ्याला दंड देखील भरावा लागतो. तेव्हा त्यांच्या गाडीचा नंबर घेतो.

- लक्ष्मण शेलार, ट्रॅफिक वॉर्डन

loading image
go to top