धक्कादायक! माणच्या कचरा डेपोत आढळले मृत अर्भक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पिंपरी : माण येथील गवारेवाडीतील डोंगरावरील कचरा डेपोत स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माण येथे कचरा डेपो असून, याठिकाणी परिसरातील कचरा आणून टाकला जातो. येथील देखरेख करण्यासाठी पारखी या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. शनिवारी (ता. 26) सायंकाळी पारखी यांना येथील कचऱ्यात अर्भक दिसून आले. त्यांनी तत्काळ हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले. पांढऱ्या कपड्यात या बाळाला गुंडाळलेले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्त्री जातीच्या बाळाचा जन्म झाल्याचे लपवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींवर पोलिसांनी रविवारी (ता. 27) गुन्हा दाखल केला आहे. अर्भकाला ताब्यात घेऊन औंध रुग्णालयात दाखल केले असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead infants found in maan waste depo