
हिंजवडी - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्या पाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला हे प्रकरणे ताजे असतानाच आयटी पार्क हिंजवडी परिसरातील नेरे-दत्तवाडी गावच्या सरपंचांना भर ग्रामसभेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, 'तुला एक ना एक दिवस तलवारीने तोडतो' अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २६) दुपारी घडला.