कोरोनात होणार विद्यार्थ्यांना केळी वाटप, पिंपरी महापालिकेच्या शिक्षण समितीचा घाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनामुळे सगळीकडे शाळा बंद आहेत. मात्र, महापालिकेच्या शिक्षण समितीने विद्यार्थ्यांना पोषण आहारात दोन केळी देण्याचा घाट घातला आहे.

पिपरी : कोरोनामुळे सगळीकडे शाळा बंद आहेत. मात्र, महापालिकेच्या शिक्षण समितीने विद्यार्थ्यांना पोषण आहारात दोन केळी देण्याचा घाट घातला आहे. यातून नेमके कोणाचे पोषण केले जाणार आहे, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळेतील पहिली ते आठवीतील हजारो विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून सकस पोषण आहार पुरविण्यात येतो. त्यासाठी सरकारकडून आवश्‍यक अनुदान दिले जाते. फक्त बालवाडीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून पोषण आहार दिला जातोय. महापालिकेच्या 70 शाळांना अन्नामृत फाउंडेशन (इस्कॉन) कडून आहार दिला जातोय. तर उर्वरित शाळांना संस्था व बचत गटाकडून पुरविण्यात येत आहे. या आहारात आवश्‍यक तेवढे पोषक घटक दिले जात असताना, अचानकपणे केळी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याबाबत अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या शाळा बंद आहेत, मग विद्यार्थ्यांना पोषण आहार कसा पुरविणार आहेत. याबाबत सांशकता असून, प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन केळी आठवड्यातून दोन वेळा देण्याचा प्रस्ताव समितीचे सदस्य शशिकांत कदम आणि निर्मला गायकवाड यांनी मांडला आहे. त्याला समितीच्या सभापती मनिषा पवार यांनी मान्यता दिली असून, येत्या बुधवारी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिकेने दोन केळांसाठी 6 रुपये मोजले असून, त्यासाठी 'विद्यार्थी आरोग्य' या लेखाशिर्षावरील उपलब्ध 2 कोटीच्या तरतूदीतून खर्च करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. मुळातच केंद्रशासनाकडून पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. मग महापालिकेने दोन केळांसाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी प्रश्‍न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मुलांना पोषण आहाराची गरज आहे. त्यासाठी त्यांना आहारात केळी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात येणार आहे. ' 
- मनिषा पवार, सभापती शिक्षण समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to distribute bananas to students