शेतकऱ्यांच्या बांधावरच होणार माती, पाणी परीक्षण; अॅग्रो अँब्युलन्सचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फिरत्या माती, पाणी व पानदेठ परीक्षण प्रयोगशाळेचा (अॅग्रो अँबुलन्स) लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.

वडगाव मावळ (पुणे) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फिरत्या माती, पाणी व पानदेठ परीक्षण प्रयोगशाळेचा (अॅग्रो अँबुलन्स) लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना सुरू करणारी पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. ही ऍग्रो अँम्ब्युलन्स शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती व पाणी परिक्षण करून त्याचा अहवाल जागेवरच देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशांची बचत होणार आहे, अशी माहिती कृषी सभापती वायकर यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dedication of agro ambulance to farmers by deputy chief minister ajit pawar