देहू देवस्थान भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज !

मुकुंद परंडवाल
Sunday, 15 November 2020

दररोज सकाळी नऊ वाजता भाविकांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली. त्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थाननेही देऊळवाडा दर्शनासाठी बंद केला. तसेच यंदाचा आषाढी वारीचा पालखी सोहळा देऊळवाड्यातच मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

देहू : गेले सात महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेली मंदिरे सोमवारी (ता.16) उघडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. कोरोनाचा पार्दुभाव रोखण्यासाठी देऊळवाडा संपूर्णपणे सॅनिटाईज केला आहे. तसेच सोशल डिस्टन्स राखण्यासाठी सहा फूटावर चौकोन आखण्यात आले आहेत.

दररोज सकाळी नऊ वाजता भाविकांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली. त्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थाननेही देऊळवाडा दर्शनासाठी बंद केला. तसेच यंदाचा आषाढी वारीचा पालखी सोहळा देऊळवाड्यातच मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत तुकाराम महाराजांच्या पादूका एसटी बसने पंढरपूरकडे नेण्यात आल्या होत्या. त्यानंतर देऊळवाडा बंद होता. अनेक भाविक या दरम्यान देऊळवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ येवून बाहेरून दर्शन घेवून माघारी जात होता, मात्र राज्य सरकारने सोमवारपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे देहूतील संत तुकाराम महाराज संस्थान आणि ग्रामस्थ,भाविकांनी पेढे वाटून स्वागत केले.

लेण्याद्री दर्शनाचा मार्ग सोमवारपासून खुला; भाविकांना नियम बंधनकारक

संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. याबाबत संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितले. रविवारी(ता.15) देऊळवाड्यात स्वच्छता करण्यात आली.तसेच संपूर्ण देऊळवाडा, देऊळवाड्यातील विठ्ठलरुक्मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, राममंदिर, महादेवाचे मंदिरात सॅनिटाईज करण्यात आले आहे. तसेच भाविकांना दर्शनासाठी दर्शनबारीतून सहाफूटावर चौकौन तयार करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता दर्शनाला सुरवात होणार आहे तर, दर दोन तासांनी मंदिर बंद करण्यात येणार आहे. त्याकाळात देऊळवाडा पुन्हा सॅनिटाईज करण्यात येणार आहे. देऊळवाड्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून सोमवारी पहाटे दररोज प्रमाणे महापूजा करण्यात येणार आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dehu Devasthan ready to welcome devotees after Corona Pandemic