esakal | देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे १३ कर्मचारी एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे १३ कर्मचारी एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह}

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डातील १३ कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील १२ कर्मचाऱ्यांना हिंजवडीतील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

pimpri-chinchwad
देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे १३ कर्मचारी एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देहू (पुणे) : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डातील १३ कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील १२ कर्मचाऱ्यांना हिंजवडीतील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याचा लग्नाला यातील काही कर्मचारी राजस्थान येथे गेले होते. त्यामुळे ते कोरोना बाधित झाल्याची चर्चा देहूरोडमध्ये सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्यात राजस्थान येथे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांचे राजस्थान येथे लग्न होते. या लग्नासाठी बोर्डाच्या सदस्यांसह काही कर्मचारी लग्न सोहळ्यास गेले होते. सोहळ्याहून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २६) कोरोना टेस्ट केली. दुसऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला. त्यामुळे बोर्डाच्या १२ कर्मचाऱ्यांना हिंजवडी येथील विप्रोच्या कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. एकावेळी एवढे कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याने बोर्डातील प्रत्येक विभागात सध्या दोन ते तीन कर्मचारी कार्यरत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत बोर्डाचे कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत म्हणाले, ‘‘बोर्डाचे एकूण १३ कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी १२ जणांवर हिंजवडीत उपचार सुरू आहेत. सध्या बोर्डाच्या कार्यालयात प्रत्येक विभागात दोन कर्मचारी कार्यरत आहेत.’’