VIDEO : लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवडमधील उद्यानांची 'ही' कामे खोळंबली!

VIDEO : लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवडमधील उद्यानांची 'ही' कामे खोळंबली!

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या उपक्रमाअंतर्गत शहरातील उद्याने सुरक्षित करण्यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असले, तरी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे त्यामध्ये खंड पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये हळूहळू शिथिलता येत असली, तरी येत्या काही दिवसांमध्ये मॉन्सूनला सुरुवात होईल. त्यामुळे हे काम पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

काय आहे उपक्रम...

शहरातील मोठ्या उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सुटीच्या दिवसांमध्ये यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे अशा उद्यानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. भोसरीमधील सहल केंद्राच्या परिसरात सीसीटीव्हीसाठी आवश्‍यक असणारे खांब बसवण्याचे काम लॉकडाउन जाहीर होण्याअगोदरच पूर्ण झाले आहे. कोरोनाचे संकट ओढावले नसते, तर आतापर्यंत याठिकाणी कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले असते. उद्यानांच्या सुरक्षिततेसाठी हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत. उद्यानांमध्ये कोणाची ये-जा होत असते, याबरोबरच काहीवेळा खेळताना मुले हरवण्याचे प्रकार देखील याठिकाणी घडत असतात, अशा प्रकारांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा उपयुक्‍त ठरणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मोठ्या उद्यानांचा आकार पाहून त्याठिकाणी किती कॅमेरे बसवण्याची आवश्‍यकता आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष उद्यानाच्या आवारामध्येच राहाणार आहे. कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ही उद्याने पूर्णपणे सुरक्षित होणार आहेत. याखेरीज उद्यानांमध्ये वायफाय सुविधा पुरवण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याचे काम देखील अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाउनमुळे ते अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. काही उद्यानांमध्ये स्थापत्य विभागाकडून पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि अन्य देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. आता मजूरच गावी निघून गेल्यामुळे ती कामे अडकून पडली आहेत. पावसाळा सुरू होण्यास एक आठवड्याचा अवधी बाकी आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्मार्ट सिटीच्या उपक्रमाअंतर्गत शहरातील मोठ्या उद्यानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्याने सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. शहरातील 25 ते 30 मोठ्या उद्यानांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येत असून एकूण उद्यांनाचा आकडा 130 आहे. 

- दत्तात्रेय गायकवाड, उद्यान अधीक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com