
Labour Court PCMC
Sakal
पिंपरी : उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात कामगार न्यायालयाच्या (लेबर कोर्ट) स्थापनेची मागणी तीव्र होत आहे. शहरातील हजारो कंपन्यांमध्ये लाखो कामगार कार्यरत आहेत. कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या तक्रारी, वाद आणि अन्यायाविरुद्ध न्याय मिळविण्यासाठी त्यांना पुण्यात धाव घ्यावी लागते. यात वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय होत असल्याने स्थानिक पातळीवर कामगार न्यायालय सुरू करावे, अशी मागणी आहे.